बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र चीफ / एस.के.चांद यांची रिपोट.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली त्याच्यासाठी पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाचे सचिव मीनाक्षी गिरी मॅडम या उपस्थित होत्या तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे सहसचिव चंद्रकांत तोरणे सर व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे गुणलेखक संदीप पाटील सर तसेच टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण अध्यक्ष आशिष डोईफोडे हे उपस्थित होते तसेच ही उपस्थित होत्या या पंच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता तसेच या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन सोमनाथ भोसले यांनी केले.