क्राईम डायरी

यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त 

यवतमाळ/राळेगांव सराफा दुकाणफोडीचा गुन्हा काही तासातच उघडकीस ११,६६,३५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त

 

लतीब शेख विशेष जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पो.स्टे. ची कारवाई

 

दिनांक १०/०७/२०२४ रोजी राळेगांव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यापसायीकाचे राळेगांव सराफा लाईन मध्ये असलेले श्री. महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान सडपातळ बांध्याच्या तिन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करुन दुकानातील सोन्या चांदीचे दागीने एकुण ८,९४,३५० रुपयाचे चोरी करुन पळुन गेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी फिर्यादी अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी पोलीस ठाणे राळेगांव येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ३०९ (४), ३३१ (६), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. होता गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सो यांनी स्था.गु.शा. यवतमाळला गुन्हा तात्काळ उघडकीस आणन्याचे आदेश दिले त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन घटनास्थळाची पाहाणी केली आणि पोलीस ठाणे राळेगांव येथील अधिकारी अंमलदार यांचे मदतीने तांत्रीक तसेच गोपणीय माहितीचे आधारे आरोपी १) नाजीम उर्फ बाबु खान असलम खान वय २२ वर्षे, २) समीर खान हसन खान वय २७ वर्षे, दोन्ही रा. मोहसीन लेआउट, डोर्ली रोड यवतमाळ, ३) सोहेल शहा रफीक शहा वय २२ वर्षे, आदर्श नगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता नमुद आरोपीतांनी सदरचा गुन्हा केल्याचो कबुली दिली त्यांचेकडुन त्यांनी गुन्हयात वापरलेले महिंद्रा कंपनीचे चारचाकी मालवाहू वाहन क्र एम. एच. २९ बि.ई. १८६० कि.अ. ०३,००,०००/- व ०१ मो.सा. क्र. एम.एच. २९ बि.ई. ७६८६ कि.अ. ९०,००० रु, ०३ मोबाईल कि.अं. ३०,००० रु, गॅस कटर व सिलेंडर कि.अ. ६,००० रु तसेच गुन्हयात चोरी गेलेले सोन्या चांदीचे संपुर्ण दागीने कि. ७,४०,३५०/- रु असा एकुण ११,६६,३५०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करणे करीता पो. ठाणे राळेगांव यांचेकडुन तपास सुरु आहे.

 

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा, पो.नि. रामकृष्ण जाधव पो.स्टे. राळेगांव व स्थागुशा कडील सपोनि अमोल मुडे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनिकांत मडावी, बबलु चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, अमीत झेंडेकर, मिथुन जाधव तसेच पो.स्टे. राळेगांव येथील पोउपनि दिपक राने. पोलीस अंमलदार गोपाल वास्टर, सुरज चिवाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *