फुलसावंगी पायदळी जात असलेल्या महिलेवर माकडांनी केला हल्ला
हिंगणी कोल्हापुरी बंधाऱ्यावरील घटना
मराठवाडा आणि विदर्भाच्या पैनगंगा तीरा काठावर फुलसावंगी पासून 3 कि.मी अंतरावर असलेल्या हिंगणी फाट्यावरून कान्होपात्रा संतोष मस्के वय ३० वर्षे ही महिला आपल्या दोन लहान मुलांसोबत पायदळी जात असताना हिंगणी जवळील कोल्हापुरी बंधाऱ्या वर चार लाल तोंडया माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला केला व हातातील पर्स हिसकावून घेतली आणि त्याच्यात काही खाण्या चे सामान समजून ती पर्स बंधाऱ्याच्या भिंतीवर बसून त्यातील सामान अस्त-व्यस्त करीत पाण्यात फेकून दिले, बिचारी ती महिला रडत बसली असता त्या बंधाऱ्या वरून लोकं जात असताना त्यांनी त्या महिलेला विचारपुस केली असता त्या महिलेने सर्व आप बिती लोकांना सांगितली तिचा पर्स मध्ये ३५ हजार रुपये रोख आणि एका तोळ्या ची एक पोत होती माकडांनी उडी मारून ती पर्स हिसकावून घेतली आणि त्यातील सामान फेकून दिले बंधाऱ्या खाली काही भोई मासोळ्या पकडत होते त्यांना येथील लोकांनी सागितले असता भोई लोकांनी प्रयत्न करून १४ हजार रुपये पाण्यातून काढून दिले बाकी २१हजार आणि एका तोळ्या ची पोत सापडली नाही. या कोल्हापुरी बंधाऱ्यावर नेहमी हे चार माकडे बसून राहतात आणि रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांच्या हातातील काही ही असो हिसकावून घेतात फुलसावंगी ते हिंगणी हा दोन किमी पांदण रस्ता असून या रस्त्याने शाळेतील मुले आणि मुली देखील रोज ये -जा करीत असतात ,या उपद्रवी माकडाच्या मर्कट लीला मुळे पादचारी त्रस्त असून वन विभागाने त्वरित या माकडा चे बंदोबस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे