उमरखेड येथे भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे भव्य प्रशिक्षण शिबिर आज संपन्न.
यवतमाळ प्रतिनिधी /
“वर्तमान भारतात विद्यार्थी युवा यांना संविधानिक हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे फार मोठे षडयंत्र सुरू आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत झाले पाहिजे.”
असे प्रतिपादन,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र राज्य प्रचारक अविनाशजी शेंडे यांनी केले.
ते उमरखेड येथे आयोजित भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा च्या प्रबोधन प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात एकाचवेळी ह्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्घाटक म्हणून भारतीय युवा मोर्चा चे विद्वानभाऊ केवटे हे होते.”अठरापगड जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची विचारधारा जाणून वर्तमान परिस्थितीत वाटचाल करायला हवी.आज बेरोजगारी, खाजगीकरन,वगैरेंसारख्या समस्यांमुळे विद्यार्थी निराश होत आहेत यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा सारख्या राष्ट्रव्यापी संघटनांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.”
असे आव्हान करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन,सुभाषजी पाईकराव ,नायब तहसीलदार उमरखेड,हे होतेवक्ते तर प्रमुख वक्ते म्हणून भारतीय युवा मोर्चा चे संजय बनसोडे, बीएमपी च्या लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर, बिमोद मुधाने,गणपत गव्हाळे, मराठा सेवा संघाचे दासाभाऊ चव्हाणहे होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षण सुरेश गोरे तथा नुक्तेत युपीएससी द्वारे एसीपी म्हणून नियुक्ती झालेले उमरखेड तालुक्याचे सुपुत्र अजय इटकरे यांना सन्मानित करण्यात आले.
भारतातील विद्यार्थ्यांनी व्यक्तिगत भविष्याची लादही लढत असताना आपले हक्क अधिकार वाचविण्याची सुद्धा लढाई लढली पाहिजे यासाठी एकट्याने न लढता भारतीय विद्यार्थी मोर्चा सारख्या राष्ट्रव्यापी संघटनांचा प्रचार आणि प्रसार करावा.असा संदेश ह्या प्रशिक्षण शिबिरातून देण्यात आला.
यावेळी शेकडो युवकांनी भारतीय युवा मोर्चा मध्ये प्रवेश केला.
ह्यावेळी राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघाचे टिळक राठोड, भारत कांबळे,विकास गावंडे,मिलिंद चिकाटे,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राजश्री कांबळे, माया पाईकराव,गोदावरी केवटे, रमा कांबळे,तसेच भारतीय विद्यार्थी युवा मोर्चा चे जीवक पंडीत
हे उपस्थीत होते.भुषण पठाडे,साहिल रोकडे,यश भवरे,दिनेश पवार,महेश पवार,अभिषेक बघाटे, प्रज्वल लोणकर,सुमेध पाईकराव,अमोल पाटील,, अदनान भाई, मुनव्वर खान यांनी ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
ह्या कार्यक्रमाचे संचलन शुभम खंदारे तर आभार प्रदर्शन साहिल रोकडे यांनी केले.