ताज्या घडामोडी राजकारण

महागांव नगर पंचायतच्या वतीने अग्निशमन वाहनाचे लोकार्पण. (माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या पाठपुराव्याला यश)

महागांव नगर पंचायतच्या वतीने अग्निशमन वाहनाचे लोकार्पण.

(माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या पाठपुराव्याला यश)

 

जिल्हा संपादक एस के शब्बीर

 

महागाव :-नगर पंचायतच्यावतीने अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ सुनंदा कोपरकर यांच्या हस्ते पार पडला.

महागाव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वदूर पसरला असुन तालुक्यात जवळपास १५०गावांचा समावेश आहे.तालुक्यात अनेक वेळा अनेक गावांमध्ये घरांना ,दुकानांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत यावेळी आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा तालुक्यात उपलब्ध नसल्याने लगतच्या पुसद,उमरखेड,आर्णी व नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते त्यामुळे ही वाहने इतक्या दुरून येई पर्यंत आग लागलेली घरे,दुकाने बेचिराख होवुन जात ही गंभीर बाब लक्षात घेवुन महागाव नगर पंचायतीचा माजी नगराध्यक्षा सौ करुणा नारायण शिरबिरे व तत्कालीन आरोग्य सभापती विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी महागाव नगर पंचायत ला अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी शासन दरबारी अनेक निवेदने,संबंधित विभागाचे मंत्री,अधिकारी यांच्या भेटी गाठी घेवुन मागणी करीत पाठ पुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश येवुन महागाव नगर पंचायतला शासनाच्या वतीने अग्निशमन वाहन पुरविण्यात आले आहे यामुळे तालुक्यातील आगीच्या व तसेच इतर अनुचित प्रकारावर वेळीच नियंत्रण ठेवणे सोपे होणार असल्याचे समाधान नागरिक व्यक्त करीत आहेत.

नगर पंचायतला अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यानंतर या वाहनाचा लोकार्पण सोहळा विद्यमान नगराध्यक्षा सौ.सुनंदा दिलीपराव कोपरकर यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी ज्येष्ठ नगरसेवक संभाजीराव नरवाडे,उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,आरोग्य सभापती गजानन साबळे,बांधकाम सभापती विशाल पांडे, गटनेते शैलेश कोपरकर,नगरसेवक सुजितसिंह ठाकुर,नगरसेविका सौ.सुरेखा विनोद कोपरकर,सौ.रुपाली संतोष कोल्हेकर सौ.सुनीता शिवाजी डाखोरे,शिवसेना (उबाठा)विधानसभा प्रमुख भिमराव भालेराव,तालुकाप्रमुख रवींद्र भारती,माजी नगरसेवक नारायण शिरबिरे,विनोद कोपरकर,डॉ.पंजाबराव राठोड,रफिक सुरैय्या,संजय नागरगोजे,गजानन वाघमारे ओमप्रकाश देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *