राजकारण

यवतमाळ /मतदानाचा अधिकार असलेल्या सर्व महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ द्या.

 

जनआंदोलन संघर्ष समितीची तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे मागणी.

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असुन याकरिता २१वर्षांवरील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या योजनेचा लाभ मतदानाचा अधिकार असलेल्या तरुण मुलीसह सर्व महिलांना देण्यात येवुन त्याकरिता फक्त आधार कार्ड व बँकेचे पासबुक एवढेच कागदपत्रे घेण्यात यावे तसेच लाभार्थी महिलेला प्रत्येकी ऐक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची अट घालण्यात यावी अशी मागणी जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.

राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागु केली असुन यामध्ये २१ते ६५वयोगटातील पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला दरमहा१५००रू अनुदान मिळणार आहे.परंतु ही वयाची अट शिथिल करून मतदानाचाअधिकार असलेल्या तरुण मुलीसह प्रत्येक महिलांना योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच या योजनेसाठी भरमसाठ कागदपत्रे मागितल्याने महिलांना ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपला वेळ व पैसा गमावून दलाल लोकांची भरती करावी लागत आहे त्यामुळे या योजने करीता कागदपत्र म्हणुन आधार कार्ड व बँकेचे पासबुक एवढेच घेण्यात येवुन प्रत्येक लाभार्थ्यांना ऐक झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची अट घालून वर्षभरानंतर जी झाडे संवर्धन करणार नाहीत त्या लाभार्थ्यांचे मानधन बंद करण्यात यावे यामुळे महाराष्ट्रात काही वर्षात सर्वत्र वृक्ष लागवडीमुळे झाडेच झाडे दिसतील त्यामुळे तापमान निश्चित कमी होईल ही

ही योजना ग्राम पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत राबवल्यास आर्थिक पिळवणूक थांबुन लोकांचा पैसा व वेळ सुद्धा वाचेल अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी केली आहे या वेळी जगदीश नरवाडे, प्रीती सुनील आंबेकर, अवंती सुखदेव बेले नरेंद्र खंदारे माजी सभापती पंजाबराव पवार साहेबराव जाधव मोतीराम चव्हाण विजयराव सूर्यवंशी उपस्थित होते.

 

राज्य शासनाने महिलांसाठी राबविलेली लाडकी बहिण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे यामुळे महिलांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे बऱ्याचशा आबला महिलांना आधार मिळाला त्याबद्दल शासनाचे विशेष आभार परंतु ही योजना अमलात आणताना वाढत्या तापमानाचा विचार करून त्यावर उपाय म्हणुन प्रत्येक लाभार्थी महिलेला ऐक वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याची अट घालावी जेणे करून यामुळे वाढत्या तापमानाच्या समस्येवर तोडगा निघेल त्याच प्रमाणे पावसाचे प्रमाण वाढून भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ होवून पाणी टंचाईवर सुध्दा मात करता येईल.

:- जगदीश नरवाडे (संस्थापक अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समिती)

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *