ढाणकी पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ.प्रा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम आयोजित केला..
अपेक्षांचे ओझं वाहणारा बाप आहे: डॉ. प्रा. वसंत हंकारे
उमरखेड ढाणकी प्रतिनिधी: आधुनिकरणाच्या नावाखाली भारतीय संस्कृती विसरत पश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत आपल्या जीवनाची कुटुंबाची मान मर्यादा धुळीस मिळवणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कुठेतरी विराम लागला पाहिजे या उद्देशाने ढाणकी शहर पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ. प्रा. वसंत हंकारे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ वसंतराव चंद्रे पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड व उद्घाटक सुरेश जयस्वाल नगराध्यक्ष ढाणकी, स्वागत अध्यक्ष शेख जाहीर जमीनदार उपनगराध्यक्ष, शेख खाजा शेख फकरू मा. सभापती पं स यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संयोजक रोहित वर्मा महामंत्री भाजपा युवा मोर्चा यांनी शहरातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करण्याबाबत हंकारे यांना प्राचारण केले
प्रबोधन कार्यक्रमात बोलताना हंकारे बोलले की मुली मुलं तरुण वयात पदार्पण करताना वडिलांची व आईची माया विसरून कुठेतरी विपरीत बुद्धीचा विचार डोक्यात आणून कोणाच्यातरी प्रेमाच्या जाळ्यात अडकून बापाला विसरून जाता पण हे लक्षात ठेवा अपेक्षांचे ओझं वाहणारा हा बाप असतो असे त्यांनी भाषणामध्ये सांगितले हंकारे यांच्या भाषणादरम्यान बऱ्याच विद्यार्थिनींना व पालकांना अश्रू आवरले नाही
या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती ज्ञानोबा देवकते पोलीस निरीक्षक यवतमाळ, विजय चव्हाण पोलीस निरीक्षक अकोला, प्रताप बोस पोलीस निरीक्षक यवतमाळ, यांचा सत्कार करून विशेष उपस्थिती विजयराव खडसे मा आमदार, नितीन भुतडा, राजेंद्र नजरधने मा. आमदार, भावी भगत, महेश पिंपरवार ,रामराव गायकवाड आनंद चंद्रे, रुपेश भंडारी ,रमण रावते पोलीस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ढाणकी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्मानंद मुनेश्वर, विनोद गायकवाड , उदय पुंडे, स्वप्निल चिकाटे, मोहन कळमकर ,पंजाब भूतनाथ, करण भरणे नंदकिशोर जाधव व सतीश मुनेश्वर यांनी फार परिश्रम घेतले सूत्रसंचालन बबलू जाधव तर आभार रोहित वर्मा यांनी मानले