यवतमाळ प्रतिनिधी / एस. के. शब्बीर
आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावे, या आशेने यवतमाळ तालुक्यातील सुकळी येथील हभप राजूभाऊ गावंडे सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ उज्वला गावंडे,यांच्या मार्गदर्शनात वारकरी भक्तगणांनी श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडी काढण्यात आली. पायदळ दिंडीत येळाबारा, सुकळी, मुरली येथील भाविकांनी सहभागी होऊन सुखी संसाराची सोडुनिया गाठ… पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत पंढरपूराला विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले. ही दिंडी (पालखी) बुधवारी दुपारी महागाव येथे पोहोचली.
दरम्यान महागाव येथील सेवानिवृत्त महसूल कर्मचारी दीपकराव सुरोशे राज्य दैनिक बाळकडू चे विदर्भ प्रतिनिधी एम डी सुरोशे, रवी सुरोशे, सौ.दुर्गा सुरोशे, सौ राणी सुरोशे मनीषा सुरोशे, मृण्मयी, रियांश, गार्गी, निकुंज, स्मित यांनी त्यांच्या घरी या पायदळ दिंडीतील वारकरी मंडळीचे स्वागत करण्यात आले. तसेच आरती व पूजा करण्यात आली. तसेच यावेळी सतीश मंगल कार्यालयाचे संचालक सतीश देवरकर यांनी भोजनासाठी मंगल कार्यालय निशुल्क उपलब्ध करून दिले होते. माजी आमदार राजूभाऊ नजरधणे , शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट राजू राठोड यांनी सुद्धा दिंडीमध्ये सहभाग नोंदविला.
तसेच श्री सत्य साई सेवा समिती महागाव तर्फे मोफत रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉक्टर भेंडे यांनी ५० वारकऱ्यांची तपासणी केली व औषधी देण्यात आली त्यांचे सोबत संजय चिंतामणी साई सेवक देविदास डंभे,उमेश आंडगे, पूजा भांगे, सोनल कोल्हेकर ,यांनी सेवा देण्याचे कार्य केले.
ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. या • दिंडीतील वारकरी मंडळी पालखीसोबत दररोज २५ किलो मीटर पायदळ चालत प्रवास करतात.