क्राईम डायरी राजकारण

उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

 

यवतमाळ प्रतिनिधी,

“देशात सरकार स्थापन होऊन तिन आठवडे उलटले नाही तर निष्पाप मुस्लिमांच्या मॉबलिंचींग च्या अनेक घटना घडलेल्या आहेत.अशा घटना ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत.यासाठी काही धर्मांध आणि संविधान विरोधी संघटना आणि असामाजिक तत्व जबाबदार असून आम्ही अठरापगड जातितील बहुजन बांधव मुस्लिमांना न्याय मिळावा म्हणून संविधानिक पद्धतीने भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रिय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब,यांच्या नेतृत्वात संविधानिकरित्या मैदानात उतरलेलो आहोत”.

असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वानभाऊ केवटे यांनी केले.

ते उमरखेड तहसिल कार्यालयात निवेदन देताना बोलत होते.

 

भारतात निष्पाप मुस्लिमांच्या कधी लव जिहाद,कधी गो तस्करी, यांच्यां नावावर काही असामाजिक तत्वांद्वारे संविधान विरोधी कृत्य करून हत्त्या करण्यात येत आहेत.अनेक भाजपा शासित राज्यांमध्ये साठ साठ वर्षांपासून निवास करणाऱ्या मुस्लिमांना धर्मा च्या नावावर टार्गेट करून त्यांची घरे बुल्डोजर चा वापर करून पाडण्यात येत आहेत.म्हणून त्यांना न्याय मिळावा यासाठी

भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे देशभरात आज तहसीलदार तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.त्याअंतर्गत आज उमरखेड तहसिल येथे निवेदन देण्यात आले.

 

यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये गुन्ह्यांतील

दोषींना फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कडक कारवाई करावी,

ज्या निष्पाप मुस्लीम बांधवांच्या हत्त्या करण्यात आल्या,त्यांच्या घरच्यांना एक एक करोड,एक सरकारी नोकरी असा मोबदला देण्यात यावा.तसेच येणाऱ्या काळात असे संविधानविरोधी कृत्य घडू नये आणि धार्मिक अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय होऊ नयेत यासाठी ‘कम्यूनल वायलंस प्रिवेंशनल ॲक्ट, लागू करून त्याची तात्काळ अंमल बजावणी करावी यांसह अनेक मागण्या घेऊन आज उमरखेड येथे निवेदन देण्यात आले.

 

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी च्या लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर,राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बार भाई,राष्ट्रीय किसान मोर्चाचे पुंजाराम हटकरे, बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे मिलिंद चिकाटे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे प्रल्हाद मेंडके,राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघाचे विनोद छत्रपती क्रांती सेनेचे दीपक पाटील, भिल्ल आदिवासी नाईक डा संघटनेचे पिलवंड यांनी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा च्या ह्या आंदोलनाला आपले समर्थन दिले.

यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे ऋषिकेश देवसरकर,साहिल रोकडे , श्रेयश देशमुख,भारत मुक्ती मोर्चा चे राजुभाऊ हणवते, दाऊद भाई,आत्माराम हापसे,शंकर खिल्लारे,शारुख भाई, मुन्नवर खान, सैयद आतीक,आवेज भाई,अमोल पाटील,बाजीराव गायकवाड,पुंडलिक तलवारे,संतोष चंद्रवंशी,शामराव केवटे,दिगंबर कदम यांसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *