राजकारण

उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा.

उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा.

यवतमाळ प्रतिनिधी,

 

“या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा अठरापगड जाती धर्मातील बहुजनांच्या समस्या सोडविल्या नाहीत.

यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपुर्ण देशभरात कार्यरत आहे”.

असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष शश्रीकांतदादा होवाळ यांनी केले.ते महागाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बहुजन मुक्ती पार्टी उमरखेड विधानसभेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

 

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी उमरखेड महागाव विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने मैदानात उतरनार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी उमरखेड विधानसभेच्या अध्यक्ष पदी संजय बनसोडे तर प्रभारी पदी चक्रधर पाटील देवसरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

उमरखेड महागाव विधानसभा कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांची निवड करीत चार हजार कार्यकर्त्यांना बुथ बांधणी ची जबाबदारी देत.मोठ्या प्रमाणात जनमानसात पोहोचण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 

भारतातील संपूर्ण नागरिकांच्या मूलभूत तसेच सर्व समस्या सोडवू असे बाँड पेपर वर लिखीत देत जनतेमध्ये विचारधारा घेऊन जाण्याचे वक्तव्य प्रशांत ठमके जिल्हाध्यक्ष यांनी केले.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वान भाऊ केवटे, हिंगोली लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर,बहुजन मुक्ती पार्टी चे पुंजाराम हटकरे, गणपत गव्हाळे,रमेश कांबळे,प्रमोद जाधव,मिलिंद चिकाटे,शेख जब्बार,पुंडलिक तलवारे हे होते.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रकाश कांबळे,अमोल पाटील, भुषण पठाडे,विनोद बनसोडे, बंडुभाऊ गंगावणे,शुभम खंदारे,साहिल रोकडे,रोहित कांबळे,संतोष ढगे,मुनव्वर भाई,संजय राखडे,देवराव पाईकराव,रमेश कांबळे,संतोष ढगे,मायाताई पाईकराव,

उर्मिला खोकले,विनोद बनसोडे,शुभम खंदारे,राहुल गायकवाड,सुमेध पाईकराव,

बंडू गोस्वामी,सुदाम गोस्वामी,करण दोडके,विशाल भालेराव, प्रल्हाद गोस्वामी,संदीप अधने,श्रीराम गोस्वामी,शुभम जोगदंड, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *