उमरखेड तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला
माती परीक्षण व मार्गदर्शन प्रकल्प
उमरखेडः तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला. यावेळी कृषीकन्या कु.श्रेया कन्नाके, कु. माहेश्वरी सुरोशे, कु. मयुरी चौधरी, कु. निकिता महुरले, कु. नंदिनी राठोड, कु. अनुजा जाधव, कु ऋतुजा चिकने यांनी अनुक्रमे अण्णाभाऊ जाधव, यांच्या शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे मार्गदर्शन करण्यात आले. माती परीक्षणातून नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्मअन्नद्रव्य जमिनीचा सामू विद्राव्य क्षारांचे प्रमाण आधीची माहिती परीक्षणातून मिळाल्याने पीक लावगड सोपी होते व उत्पन्नात वाढ होते अशी माहिती यावेळी देण्यात आली. माती परीक्षण करताना जमिनीचा
उंच-सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून 5 ते 18 नमुने घ्यावेत. त्यासाठी 25 सेमी खड्डा करावा व कापडी पिशवीत माती प्रयोगशाळेत पाठवावी असे आवाहन करण्यात आले. सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख श्री. व्हाय. एस. वाकोडे सर व मृदा विषयतज्ञ प्राध्यापिका कु.के.एस. सोळके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी:लतिफ शेख