महागांव न्यूज / जगदीश नरवाडे यांनी पिक विमा कंपनीच्या बोगस कारभाराचा वाचला जिल्हाधिकाऱ्यां समोर पाढा.
यवतमाळ / एस,के,शब्बीर महागांव
( वरिष्ठ स्तरावर कारवाई साठी पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन)
पिक विमा कंपनीच्या हलगर्जी पणा व मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ३२हजार३९१शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिल्याने जन आंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेवुन जिल्हाधिकाऱ्यांसमोर पिक विमा कंपनीच्या बोगस कारभाराचा पाढा वाचुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा मिळण्यासंदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
खरीप हंगाम२०२३-२०२४मध्ये महागाव तालुक्यातील ७१हजार१०५शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने रीतसर विमा काढला होता.त्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते परंतु विमा कंपनीच्या प्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून नगदी पैसे उकळून विमा क्लेम केले हे सर्व होवुनही विमा कंपनीने तालुक्यातील ३२हजार३९१ शेतकऱ्यांना जाणीवपुर्वक विम्याच्या लाभापासुन वंचित ठेवले याबाबत विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी आवाज उठवून पिडीत शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा देण्यात यावा यासाठी मशाल मोर्चा काढून आंदोलन केले होते तेव्हा विमा कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवुन तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले परंतु अद्याप शेतकऱ्यांना विमा मोबदला मिळालाच नाही.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया हे दिनांक १२जुन रोजी महागाव तालुक्यात आढावा बैठक घेण्यासाठी आले असताना जगदीश नरवाडे यांनी या विमा लाभा पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना घेवुन तहसिल कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून या शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याची तसेच शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या रिलायन्स पिक विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी विमा प्रतिनिधींनी बोगस सर्व्हे पंचनामे केल्यामुळेच शेतकरी लाभा पासुन वंचित राहिला असल्याची प्रतिक्रिया देत कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून शेतकऱ्यांना पीक विमा लाभ तत्काळ देण्यात यावा तसेच विमा कंपनीवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अतिवृष्टी मुळे जल प्रलय परिस्थिती निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर बोलवून रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे ठरले प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांनी आंबोडा गावासह इतर गावाची पाहणी केली नदी नाल्या काठील शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड पाणी होते त्या शेतकऱ्याला आजपर्यंत कंपनीने मोबदला दिला नाही जिल्हाधिकारी यांनी रिलायन्स पिक विमा कंपनी चा सर्वे हा बोगस झाल्याचे आज मान्य केले शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला देऊन रिलायन्स पिक विमा कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून अधिकारी कर्मचारी व सर्वे करणाऱ्या वर फौजदारी गुन्हे दाखल करू कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करावे अशी मागणी केली
जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष
जन आंदोलन हजार संघर्ष समिती.