उमरखेड / हरदडा येथे आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषद.
धम्म हे संस्काराचे केंद्र आहे : डॉ. अनिल काळबांडे
उमरखेड विशेष प्रतिनिधी.
उमरखेड : तथागत बुद्धाने दिलेला बौद्ध धम्म हा मानवी मूल्य नीतिमत्ता जोपासणारा असून संपूर्ण मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान या धम्मामध्ये आहे या धम्माच्या आचरणाने मनुष्य दुःखमुक्त होऊन सुखाने जीवन जगू लागतो त्यामुळे बौद्ध धम्म हेच सर्वात प्रभावी संस्काराचे केंद्र असल्याचे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. अनिल काळबांडे यांनी केले ते तालुक्यातील हरदडा येथे आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसुधारक चिमणाजी काळबांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजयराव खडसे, श्रीकांत बनसोड, माजी जिप सदस्य.
किर्ती रामराव गायकवाड, रुग्णसेवक भाविक भगत, अभिजीत पाईकराव पत्रकार दत्तराव काळे’ प्रसिद्ध विधीतज्ञ डी एफ हरदडकर’, लक्ष्मण धुळे, सिद्धार्थ बरडे ‘सिद्धार्थ दिवेकर, कैलास घुगरे इ. उपस्थित होते. संचालन सुनील कवडे व प्रा. गजानन दामोदर यांनी केले तर आभार सुधाकर कांबळे यांनी मानले यावेळी परिसरात बौद्ध.
धम्मपरिषदेचे कार्यकरणार्या मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रणिता कांबळे गौतम कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले. रात्रीला भीम शाहीर दिनकर लोणकर व आशा सरपे यांच्या भीम गीतांच्या सामन्याने या कार्यक्रमाची सांगता झाली.