महागांव/पूर्वजांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करा :जगदीश नरवाडे
यवतमाळ जिल्हा संपादक एस. के.शब्बीर
जन आंदोलन आधार संघर्ष समितीचा सुत्य उपक्रम.1जून रोजी एकाच दिवशी दोन हजार वृक्षाचे मोफत वाटप महागाव
बेसुमार रोज वृक्ष तोडीमुळे तापमानात वाढ होवुन पर्जन्यमान कमी होवुन भुजल पातळी खालावली असल्याने यावर एकच उपाय असुन तो वृक्ष लागवडीचा असल्याने पूर्वजांच्या स्मरणार्थ एका व्यक्तीने एक वृक्ष लावून त्याचे बाळाप्रमाणे संगोपन करावे असे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश भाऊ नरवाडे यांनी तब्बल दोन हजार वृक्ष लागवडीचे धेय्य डोळ्या समोर ठेवून रस्त्यावरील वाट सरुला गावातील नागरिकांना व विद्यार्थी विद्यार्थिनीला मोफत वृक्ष वाटप केले आहे.
विकास कामांच्या नावावर झाडांची रोज कत्तल केल्या जावून हिरवीगार जंगले नष्ट होवुन सिमेंटची जंगले उभी राहत आहेत.झाडेच नसल्याने तापमानात विक्रमी वाढ होत आहे परिणामी पावसाचे प्रमाण कमी होवुन भुजल पातळी दिवसेंदिवस खालावल्या जात आहे
.नागरिकांना उष्ण तापमानासह,पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण भटकावे लागत आहे.तापमान वाढ रोखुन पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वृक्ष लागवड असुन यासाठी लोक सहभागातून प्रत्येक घरी दोन वृक्ष लावून संगोपन करणे काळाची गरज आहे अनेक सामाजिक संस्था,संघटना, पर्यावरण प्रेमी संघटना नेहमीच पुढाकार घेत असतात त्याच अनुषंगाने विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी यंदाच्या पावसाळ्यात लोक सहभागातून हजारो वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असुन त्या उद्देशाने त्यांनी आज महागाव येथे नागरिक,विद्यार्थी,विद्यार्थिनी,रस्त्याने जाणारे वाटसरू यांना तब्बल दोन हजार वृक्ष देवुन त्याची लागवड करून संगोपन करण्याचे आवाहन केले आहे.यावेळी लोक सहभागातून भव्य वृक्ष लागवड करण्याची भविष्यातील संकल्पना पूर्ववत नेण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिली आहे
या वृक्ष वाटप उपक्रमावेळी श्री.डी. के.मुनेश्वर वनपरीक्षेत्र अधिकारी महागांव
पी.आर. कोल्हे क्षेत्र सहा.महागांव
डी.एस् .यादव
वनरक्षक नांदगव्हाण
धुळे वनरक्षक महागांव
माहुरे वनरक्षक प्रकाश सुंदरकर महिंद्र इंगोले महागांव मंडळ अधिकारी संजय नरवाडे भिकू चव्हाण बळवंत राठोड प्रतापराव देशमुख पत्रकार संजय भगत संजय कोपरकर विजय सूर्यवंशी मनोज सुरोशे दिनेश भंडारे निलेश पाटील नरवाडे विजय राऊत ज्ञानेश्वर ठाकरे राज पाटील नरवाडे विठ्ठल इंगळे अमोल राजवाडे सुरेश नरवाडे दत्ता जाधव निलेश मस्के सुधीर नरवाडे सुभाष पाटील कूरमे मंगेश पाटील वानखेडे यांनी सहभाग घेतला गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होत्या
आपल्या पुर्वजांच्या आठवणीत ऐक वृक्ष लाऊन संगोपन करावे.
विविध कारणाने वृक्षांची बेसुमार रोज तोड करण्यात येत असल्याने तापमान वाढ व पाणी टंचाईच्या समस्येला नागरिकांना रोज तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पुर्वजांच्या किंवा मृत पावलेल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ एक झाड लावुन त्याचे नित्यनेमाने पाणी टाकून संगोपन करावे त्यामुळे तापमान वाढ कमी होवुन पावसाचे प्रमाण जास्त राहील यासाठी कुलु मनाली च्या धर्तीवर वृक्ष लागवड लोक सहभागातून करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सुद्धा हिरवागार होवुन शिमल्या सारखे थंड हवामान राहील.असे