महागाव तालुक्यातील वाकोडी वाडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट लाखोंचा नुकसान, जिवित हानी टळली..
यवतमाळ विशेष प्रतिनिधी. लतीफ शेख.
यवतमाळ जिल्हा संपादक. एस. के. शब्बीर यांची रिपोट.
महागाव तालुक्यातील वाकोडी वाडी येथे घरात गॅस सिलेंडरच्या विस्फोट झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्या सुमारास घडली .यावेळी घरात कोणी उपस्थित नसल्यामुळे मोठे जीवित हानी टळली .याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाकोडी वाडी येथील रहिवासी उत्तम मारुती भडांगे हे मुलीचे लग्नासाठी संपूर्ण परिवारासह बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरात असलेल्या गॅस सिलेंडरच्या अचानक स्फोट झाला, व घराला आग लागली. यामध्ये घरातील दुचाकी, अन्नधान्य, कापड, घरातील वस्तू व काही रोख रक्कम असा ऐकून लाखो रुपयांच्या मुद्देमाल जळून खाक झाला सदर काही घटनेची माहिती कळताच अग्निशामन दल याला पाचारण करण्यात आले लगेच पुसद येथील अग्निशामन दल हे घटना स्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले सदर घटनेची माहिती मिळतात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन घटनास्थळ दाखल झाले व पंचनामा केला.