यवतमाळ / आय.पी.एस शुभम सुरेश पवार यांचा महागांव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
महागाव तालुक्यातील पहिलाच आय.पी.एस अधिकारी होण्याचा मान शुभम सुरेश पवार यांना मिळाला आहे महागाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आज कौतुक करून सत्कार करण्यात आला
चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, हे पोलीस हवालदाराच्या मुलाने करून दाखविले आहे.
भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) ५६० वी रैंक मिळविली आहे. त्यामुळे महागाव शहरात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शुभम सुरेश पवार असे आयपीएस झालेल्या जिद्दी युवकाचेनाव आहे.
वडिल सुरेश पवार हे पोलीस खात्यातच महागाव ला बरेच वर्ष नोकरी करून ते महागाव ला स्थायिक झाले
सध्या ते पोलीस हवालदार म्हणून पुसद शहर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
शुभमने आयपीएस होण्याची जिद्द उराशी बाळगली होती. त्याचे . दहावी व बारावीचे शिक्षण नांदेड येथे घेतले. त्यानंतर अकोला येथे बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. आयपीएस होण्यासाठी रात्रंदिवस14 तास अभ्यास करून स्वतःला झोकून दिले होते. त्याच्या या यशामुळे महगाव तालुक्यासह जिल्ह्याची मान भारतात उंचावली आहे लहानाचा मोठा होत त्याने मोठे यश संपादन केल्याने तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पुष्प हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित जगदीश नरवाडे विशाल चक्रवार गजानन थडवेकर,संजय भगत ,अविनाश ,
अमोल अमिलकंठावार, विजय अर्गुलवार, विजय सूर्यवंशी, मिनाज खतीब, आमोल्उदावंत,चिन्मय मंगेश पाटील वानखेडे, वडील सुरेश पवार आई संगीता ताई तलाठी भाऊ भूषण पवार उपस्थित होते