राजकारण

महागांव/ वंचित ३२३९१ शेतकऱ्यांना तात्काळ विमा चा मोबदला मागणी साठी  चिन्मय वानखेडे चिमुकल्या यांची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद)

महागांव/ वंचित ३२३९१ शेतकऱ्यांना तात्काळ विमा चा मोबदला मागणी साठी  चिन्मय वानखेडे चिमुकल्या यांची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद)

 

यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव.

 

यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम सन २०२३-२४मध्ये महागांव तालुक्यातील ७११०५शेतकऱ्यांनी रितसर ऑनलाईन पिक विमा काढला त्याची पोच व कंपनीची पावती प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे. त्यापैकी ३२३९१ शेतकरी वंचित राहीले . शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन, निवेदन देवून सुध्दा आजपर्यंत कंपनीने सदर शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही.अस्मानी संकटाच्या माऱ्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा देण्यात यावा अशी मागणी चिन्मय मंगेश वानखेडे या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

तालुक्यातील ७११०५ शेतकऱ्यांनी सन २०२३-२४च्या खरीप हंगामात ऑनलाईन रिलायन्स पिक विमा कंपनीकडे पिक विमा काढला. त्यामध्ये ३२३९१शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचे अतिवृष्टीने नुकसान होवून सुध्दा विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वंचित शेतकऱ्यांना पिक विमा पासून लाल झेंडी.सदर विमा कंपनीचा टोल फ्रि क्रमांक हा नेहमी बंद दाखवित होता. तालुक्यातील विमा कंपनीचे कर्मचारी हे सुध्दा फोन उचलत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतली तहसिलदाराकडे धाव वरील सर्व शेतकऱ्यांनी निवेदने दिलेत. शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीची पिक विमा कंपनीचे कर्मचारी, तालुका कृषी विभागाचे कर्मचारी व तलाठी यांनी संयुक्त पाहणी सुद्धा केली. नदी, नाल्या लगत असलेल्या शेतामध्ये प्रचंड पाणी साचून त्या शेतकऱ्यांना रिलायन्स पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप दिली नाही. वरील शेतकरी पिक विमा मोबदला न मिळाल्यामुळे वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असुन शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे . विमा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ विमा देण्यात याव याकरिता अशी मागणी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांचा नातु चि.चिन्मय मंगेश वानखेडे याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन. रिलायन्स पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचा अंत आता यापुढे पाहू नये नदी नाल्या काठील शेतामध्ये समुद्रा सारखे पाणी होते अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने मोबदला दिला नाही संयुक्तपणे शेतीचा नुकसानीचा पाहाणी अहवाल आधारावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून रिलायन्स पिक विमा कंपनीला सर्वच वंचित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे.

जिल्हाधिकारी यांनी आदेश करावा अन्यथा या पुढे शेतकऱ्यानी आपले उग्र रूप धारण केल्यास त्यास जिल्हा प्रशासन जवाबदार राहील. चिन्मय मंगेश वानखेडे यांने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून अर्त साद दिला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *