लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य समस्याचां पडला विसर
यवतमाळ जिल्हा संपादक एस.के.शब्बीर
सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने प्रचाराला सुरवात झाली आसुन ऊमदवारांना दिल्ली गाठण्याची घाई झाली आसुन कार्यकर्त्याची जमवाजमव करतांना रात्रंदिवस कमी पडत आहे हा दर पाच वर्षानी येणारा लोकशाहीचा ऊत्सव प्रत्येकवेळी वेगवेगळे विषय घेऊन येत आसतो आणि नेमकी गडबड ईथेच होते हे प्रत्येक वेळचे उदाहरण आहे त्यामुळे मतदार संघातील जनसामान्याशी निगडीत समस्या जैसे थेच राहुन जातात आणि परत पाच वर्ष बोबां मारण्यापलीकडे सामान्य कारकर्ता व मतदार काहीच करू शकत नाही आणि निवडुन दिलेला लोकप्रीय ऊमेदवार गल्लीला विसरून दिल्लीचा कधी होऊन जातो समजत नाही आमच्या महागाव तालुक्यात मागील आनेक वर्षापासुन सार्वजणीक कामे याच कारणाने प्रलंबीत आहेत अशावेळी याविषयावर मंथन होऊन समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी करारी पणाची बोलणी होणे आवश्यक आसताना ऊमेदवारासोबत फोटो सेशन करणे विरोधी पक्षावर सोशल मीडिया च्या माध्यमातुन टिका टिपणी करणे ईतक्यावरच आम्ही धन्यता मानत आहोत ऊदाहर्नार्थ सा़गायचे झाल्यास आमच्या तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारा अधरपुस प्रकल्पाचे पाणि मागील चाळीस वर्षापासुन टेलपर्यरतं गेले नाही, तालुक्यात बहुतांश डिपार्टरमेटला प्रभारी आधीकारीच काम करतात,ग्रामीन विकासाची मुख्य नाडी म्हणजे पांदन रस्ते यांची आवस्था अतिशय वाईट, विजवितरण तर आनेक लोकांचे बळी घेण्याचे कारण बनले आहे, तालुक्याच्या ठिकानची आरोग्य रुग्णालयाच ईमारत चार पाच वर्षापासुन ऊदघाटणाची प्रतीक्षा करते आणि ती तातडिने सुरू करावी म्हणुन पत्रकार संघाला आंदोलनाचे हत्यार ऊपसावे लागते तीच आवस्था पोलीस स्टेशनच्या ईमारतीची, पशु चिकीत्सक सुध्दा प्रभारी त्यामुळे बोगस चिकित्सकांना शेतकर्यानां लुटण्यास रान मोकळे शिक्षण क्षेत्राची सुध्दा अतिशय दयनीय आवस्था ग्रामीन दळण वळण रस्ते जीवघेणे एकही बाब कौतुकास्पद नाही मागील पाच वर्षात आमदार किवां खासदार यांना जनतेच्या सार्वजनीक समस्याबाबत जनतेसोबत संवाद साधण्यासाठी एक दीवस सुध्दा वेळ मीळाला नाही किवां तशी आवश्यकता वाटली नाही आमचे खासदार सुध्दा या प्रभारी आधीकार्याप्रमाने प्रभारी आसल्याने समस्या सोडविणार कोन आणि आमचा मतदार राजा सुध्दा या विषयावर आवाज ऊठविण्या ऐवजी जातीधर्माच्या भांडनापासुन चार हात दुर राहणे पसंत करत आहे त्यामुळे कुठलीही माहिती किवां तयारी न करता जरी या राजकिय आखाड्यात तीकिटाची आणी बंडलाची तयारी आसणारे सुध्दा ऊडी घेण्यासाठी तत्पर दिसतात विकासाचा कुठलाही मुदद्दा कोणत्याही राजकिय पक्षात दिसत नसल्याने मोजके लोक सोडुन या लोकशाहीच्या ऊत्सवात सगळीकडे निरूत्साह दिसत आहे
गोविंदराव देशमुख सवनेकर
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गट