ताज्या घडामोडी

महागांव / वीज वितरण कंपनी किती तरुणाचा अजून बळी घेणार.

महागांव / वीज वितरण कंपनी किती तरुणाचा अजून बळी घेणार.

 

जगदीश नरवाडेची वीज मुख्य अभियंता कंपनी अमरावती यांना विचारणार.

 

मुख्यसंपादक एस.के.चांद यांची बातमी.

 

महागाव तालुक्यातील प्रत्येक गावात लाईनमन यांनी वसुली साठी आणि विद्यूत पोलवरचे काम करण्यास खाजगी लोकांना कामावर ठेवले आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे अश्या अप्रशिक्षित लोकांचे आजुन किती बळी घेणार. आज सकाळी अकरा वाजता मोहदी ता महागाव इथे खाजगी व्यक्ती लाईन मेंटेनन्स साठी पोलवर चढतो आणि काही क्षणात लाईन चालू होते आणि तो वरून खाली कोसळतो या अगोदर अशा खाजगी लोकांना विद्युत पोलवर वर चढवून लाईन दुरुस्ती करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यामुळे तालुक्यात आजपर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे त्याची पुनरावृत्ती आज सकाळी ११ वाजता मोहदी या गावी झाली यामध्ये खांब्यावर चढलेला व्यक्ती हा लाईन चालू झाली असल्यामुळे वरून खाली पडला आणि तो आता मृत्यूची झुंज देत आहे या सर्वस्वी जबाबदार येथील प्रभारी अधिकारी नागपुरे हेच आहेत त्यामुळे आपण तात्काळ कारवाई करून आजरोजी मृत्यूची झुंज देत असलेल्या व्यक्तीला आपण आर्थिक सहकार्य करावे वरील घटनेला कोण जवाबदार आहे. त्यावर कार्यवाही झाली पाहिजे प्रभारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यावर कोणतीही वचक नसल्याने सर्वसाधारण तरुण माणसाचा मृत्यू होत आहे तात्काळ जवाबदारी फिक्स करून त्यावर कार्यवाही करण्यात यावी : यापुढे अशी घटना घडल्यास सर्वशी आपण जबाबदार राहणार आहात याची आपण नोंद घ्यावी जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *