उमरखेड / जि प शाळा वसंत नगर येथे राजश्रीताई हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन संपन्न.
प्रतिनिधी / सुहास खंदारे.
.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वसंत नगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्नेहसंमेलन उडान 2024 संपन्न
सौ राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे दीप प्रज्वलन व उद्घाटन संपन्न झाले
उडान 2024 कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व उद्घाटन सौ राजश्री ताई हेमंत पाटील अध्यक्षा गोदावरी समूह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.चीतंगराव कदम संचालक जीन प्रेस उमरखेड व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास खंदारे सौ दिपालीताई आंबेकर उपाध्यक्ष बाळासाहेब खंदारे पोलीस पाटील वसंत नगर व श्री निकेश भाऊ घाडगे ग्रामपंचायत सदस्य पोफाळी मुख्याध्यापक, श्री.गणेश जामगे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन कु. अर्चना केंद्रे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन केबी. पठाण सर किशोर कदम सर, सुरेश बोरकर सर, कु. पुष्पा कल्याणकर कु.मीरा कदम यांनी केले यावेळी समितीचे सर्व सदस्य आशिष जाधव, विष्णू गायकवाड ,संतोष शिंदे ,संजय चिंचोलकर, मोबीनमियां पटेल, सौ लक्ष्मी बोंबले, सौ.ज्योतीताई खंदारे, सौ.रंजनाताई शिंदे सौ.गाडगेताई उपस्थित होते .
यावेळेस विद्यार्थ्यांच्या पालकासोबत बोलताना राजश्रीताई यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या वेळेस कशाप्रकारे स्नेहसंमेलन कार्यक्रम असायचे कशाप्रकारची तयारी असायची असे मनसोक्त गप्पा त्यांनी पालकासोबत केल्या . अशाप्रकारे अत्यंत उत्साही आनंदमय वातावरणात स्नेहसंमेलन 2024 संपन्न झाला.