जिल्हा परिषद खडका शाळेला जिल्हास्तर मूल्यांकन समितीची भेट
महागाव प्रतिनिधी-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा हे अभियान सुरू आहे. या अभियानातील महागाव पंचायत समिती मधील आदर्श व उपक्रमशील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी खडका शाळेला जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट दिली. मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानातील सर्व उपक्रम वर्ग सजावट, शालेय रंगरंगोटी ,बोलक्या भिंती, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी,किशोरवयीन मुलींचे समुपदेशन , स्वच्छ हात धुवा कार्यक्रम,माझी शाळा माझी परसबाग, प्रधानमंत्री पोषण शक्ती , तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रभावी कामकाज, गावातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी सहभाग, मेरी माटी मेरा देश, कौशल्य विकास मार्गदर्शन, शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी बचत बँक, आर्थिक साक्षरता, नव साक्षरता, स्वच्छता मॉनिटर ,पारंपारिक वेशभूषा या सर्व उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकन समितीमध्ये श्री किशोर पागोरे( जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक जि प यवतमाळ) श्री राजू मडावी( उपशिक्षणाधिकारी ), श्री श्रीधर कनाके (विस्तार अधिकारी), श्रीमती प्रणिता गाढवे( विस्तार अधिकारी) आले होते. या सर्व टीमने शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीने राबविलेले सर्व उपक्रम पाहिले व समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या जिल्हास्तर मूल्यमापन समितीचे भूमिपुत्र भाऊसाहेब देशमुख व जिजाऊ चरित्र हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी हिवरा केंद्रस्तरीय मूल्यांकन समितीमध्ये पोहंडुळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री डी एम महाले यांनी पाहणी केली. तसेच तालुकास्तर मूल्यांकन समितीमध्ये श्री संजय कांबळे (गटशिक्षणाधिकारी पं स. महागाव), श्री अनुप पंडित (शिक्षण विस्तार अधिकारी), श्री अमोल जाधव (शिक्षण विस्तार अधिकारी )यांनी सुद्धा या अभियानांतर्गत शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. जिल्हास्तर मूल्यमापन समिती भेटी प्रसंगी श्री दत्तराव कदम (उपसरपंच ग्रामपंचायत खडका), श्री संतोष देशमुख( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), श्री गजानन भामकर( शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष), डॉ. संदीप शिंदे (शाळा व्यवस्थापन समिती बाल विकास तज्ञ) ,श्री राहुल नागरगोजे (मुख्याध्यापक),विशाल शेळके (सहाय्यक शिक्षक), मोनाली चव्हाण (सहाय्यक शिक्षिका) , माधवराव मारडकर उपस्थित होते
यवतमाळ विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख