महागांव/ तालुक्यातील खडका जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा आणि माता पालक मेळावा संपन्न.
यवतमाळ विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख.
महागाव पंचायत समिती मधील आदर्श व उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत बाल आनंद मेळावा व माता पालक मेळावा(हळदी कुंकू) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन सरपंचा सौ कमलबाई देशमुख यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालक यांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व माता पालक मेळावा याचे आयोजन करण्यात आले होते. या माता पालक मेळाव्याला महिलांना मार्गदर्शन करताना उपसरपंच श्री दत्तराव कदम यांनी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांवर चांगले संस्कार दिले, शिक्षण दिले म्हणून शिवराय छत्रपती झाले जगातील आदर्श राजे झाले आपणही आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्यावे मुलांचा रोजचा गृहपाठ आपण दररोज घ्यावा, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे म्हणजे आपले मुलं सुद्धा चांगले शिकतील आणि आपली येणारी पिढी ही संस्कारमय होईल असे सांगितले. यानंतर बाल आनंद मेळाव्यातील स्टॉलला, दुकानला सर्व मान्यवरांनी भेटी दिल्या. तेथील खाण्याचे पदार्थ खरेदी केले.विद्यार्थ्यांना आर्थिक देवाण-घेवाण कळावी, पैशाचा आर्थिक व्यवहार कळावा यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्री अरुणराव देशमुख, श्री संतोष देशमुख अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,श्री गजानन देशमुख उपाध्यक्ष ,डॉ. संदीप शिंदे बाल विकास तज्ञ, श्री पाटील साहेब कृषी सहाय्यक, पत्रकार शेख लतीफ, राहुल भामकर, ग्रामपंचायत सदस्या विद्याताई भामकर, प्रगती हनवते, माया राऊत अरुणाबाई देशमुख, दशरथ मारटकर तथा सर्व माता-पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मोनाली चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्रांती फोपसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री राहुल नागरगोजे, सहाय्यक शिक्षक विशाल शेळके, ममता देशमुख ,माधवराव मारडकर यांनी प्रयत्न केले.