यवतमाळ /आरोग्य अधिकारी नरेंद्र आडेला २५००० हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
यवतमाळ विशेष प्रतिनिधी : लतिफ शेख.
महागांव येथे प्रभारी तालुका अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नरेंद्र आडे यांना आज ५:३० वाजता च्या दरम्यान २५००० हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र महागांव चे अधिकारी नरेंद्र आडे यांना पुढील चौकशीसाठी विश्रामगृहात नेण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांचे बयान नोंदविण्यात प्रक्रिया आज रोजी सुरू होती.
महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांनी आज आशा वर्कर साठी आदेश काढण्याकरिता एक लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार माळवागत येथील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी कोमल ही एम एस डब्ल्यू अशी शैक्षणिक पात्रता धारण केली असल्याने तिची नुकतीच आशा वर्कर साठी मुलाखत झाली होती या मुलाखतीनंतर तिचा नोकरीसाठी आदेश काढताना एक लाखाची मागणी करण्यात आली होती. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी पत्नी उच्चशिक्षित आहे तुम्ही पहिले आदेश काढा नंतर जे द्यायचे ते देऊ असे सांगत त्यांना विनंती केली यावेळी त्यांनी आता २५००० हजार रुपये द्या अशी मागणी केली अशी तक्रार चव्हाण यांनी यवतमाळ येथील लाच लुचपत खाते यांच्याकडे तक्रार नोंदविली या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौलत खान येथे २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुढील कारवाई प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे नरेंद्र आडे यांच्यावर कोणती कठोर शिक्षा व कारवाई होईल यांच्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.