महागांव पोलीस स्टेशन येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
महिलांना रायफल बाबत माहिती ; महिलांनमध्ये जनजागृती
महागाव विशेष प्रतिनिधी,
महांगाव – पोलिसांबाबत भीती व शस्त्र माहिती महिलांना व्हावी म्हणून महागाव पोलीस स्टेशनचे पीआय श्री सोमनाथ जाधव साहेब यांनी इतिहासात प्रथमच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याप्रसंगी सौ रसिका जगदीश नरवाडे, सौ संगीता उदय नरवाडे ,सौ कल्याणी मंगेश पाटील वानखेडे सौ वैशाली चंद्रकांत कदम मीनाक्षी संतोष मोटरवार स्नेहल ,कविता, संगीता ,पूनम अमिलकंठावार सौ सुरेखा किरण नरवाडे सौ वैशाली संतोष कदम सौ सुनंदा दिलीप कोपरकर कविता नेवारे सह हजारो महीलांनी सहभाग घेतला पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने लहान बालक महिलांनी शस्त्रे हाताळून आनंद घेतला आज दुपारपासून सायंकाळपर्यंत रस्त्याने महिलांची तोबा गर्दी बघायला मिळत होती येणाऱ्या सर्व महिला हे प्रथमच पोलीस स्टेशनमध्ये येऊन बघितल्याचे बोलताना आनंद व्यक्त करत होत्या श्री सोमनाथ जाधव यांनी स्तुत्य उपक्रम राबवून महिलांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला सर्व येणाऱ्या महिलांना मोगऱ्याचे झाड भेट देऊन आगळीवेगळी भेट देण्यात आली महिलांच्या मनातील भीती दूर करणारे असे उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनने राबवायला पाहिजे असे मत जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी म्हटले हा कार्यक्रम पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी राजश्री राठोड, ज्योती मुंडे शाबका राठोड, विद्या आत्राम यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.