उमरखेड येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण.
(उमरखेड विशेष प्रतिनिधी)
उमरखेड (दि. 10 जानेवारी) जुलै 2013 अतिवृष्टीची अनुदानित रक्कम पिक विमा कंपनीने दिलेल्या रकमेत मोठी तफावत असून वंचित असलेले असंख्य शेतकरी शेतकरी राशन अर्जाची अनुदानित रक्कम वितरित न झाल्याबद्दल अशा अनेक मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रमुख मागण्या :-
1) खरीप हंगाम 2023 ची अतिवृष्टीची अनुदानित रक्कम सरसकट शेतकरी बांधवांना तात्काळ मिळण्याबाबत.
2) खरीप हंगाम 2023 पीक विमा तफावत न ठेवता सरसकट शेतकऱ्यांना द्यावा. 3) जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले 27 लक्ष 81 हजार शेतकरी प्राधान्य रेशन कार्ड धारकांना तात्काळ अदा करावी. 4) ग्रामीण भागातील सर्व घरकुल योजनांची रक्कम कमीत कमी 3.00 लक्ष एवढी करावी. 5) घरकुल बांधकामासाठी संबंधित लाभार्थ्याला गौण खणीजाचा दंड वगळता मोफत रेती उपलब्ध करावी. 6) पिढ्यानपिढ्या कसण्यात असलेली भोगवटदार क्र.02 चि जमीन भोगवटदार क्र.01 मध्ये समाविष्ट करावी. 7) पिढ्यान पिढ्या ताब्यात असलेले इ-वर्ग, वन जमिनीचे पट्टे कसत असलेल्या लाभार्थ्यांच्या नावे नियमित करावी.8) शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वाढून द्यावा (कापुस व सोयाबीन प्रतीक्विंटल दहा हजार रुपये तसेच उस प्रतीटन 3500 एवढी रक्कम वाढून द्यावी), 9) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थी व उद्योजकांना कर्जमंजुरी द्यावी.10) वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थी व उद्योजकांना कर्जमंजुरी द्यावी.
इत्यादी वरील शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणकर्ते बबलू जाधव पाटील, प्रकाश वाघ, विनोद राठोड, नरेंद्र राठोड, मनोज कांबळे, कृष्णा अशोक ईमडे, रुपेश इथडे, आनंद वाठोरे ,देवानंद वाडेकर,
अशुतोष तारमिकवाड, प्रल्हाद रेशीम मेंढके, उमेश राठोड, रुपेश दुथडे, लखण जाधव, मारोती पिलखंड इत्यादी जन आमरण उपोषणाला बसले आहेत.