सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
महाराष्ट्रा चीफ एस.के.चांद यांची रिपोट.
जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे सम्पन झाले 14 ,17 ,19 वर्ष मुले- मुलींच्या एकूण सर्व गटातून 57 संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, कार्याध्यक्ष – परवेज गडीकर ,उपाध्यक्ष – अझहर शेख , सचिव- विजय बिराजदार ,खजिनदार – स्वप्नील सुर्वे पंच म्हणून सोमु बिरादार ,सागर मोरे, सुमित जगदने ,ऐश्वर्या कर्जवाड, प्रियांका मातगी ,राजमा तांबोळी , साक्षी अभंगे हे सर्व मान्यवर उपस्तीत होते जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा अत्यंत नेटक्या नियोजन मध्ये सम्पन झाले या स्पर्धा पार पाडण्यासाठी आमचे आधारस्तंभ अखिल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन चे संस्थापक कन्हैया गुजर सर व टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मॅडम यांचे प्रेरणा मिळाले व महाराष्ट्र टेक्निकल कमिटीचे स्वप्नील सर,महेश मिश्रा ,धनश्री गिरी ,गणेश भालेराव,संदीप पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले
14 वर्ष मुलांच्या गटामध्ये प्रकाश पब्लिक स्कुल स्कुल इस्लामपूर संघाने प्रथम क्रमांक मिळवला
14 वर्ष वयोगट मुलींच्या गटामध्ये एम व्ही हायस्कुल उमदी ता जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला
17 वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कुल जत ने प्रथम क्रमांक मिळवला
17 वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत लायन्स स्कुल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला
19 वर्ष वयोगट मुलांच्या स्पर्धेत यशवंतराव हायकुल देवराष्ट्रे ता कडेगाव या संघाने प्रथम क्रमांक मिळवला
19 वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायकुल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला
वरील सर्व संघाचे सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले आहे या सर्व संघाचे संघ मार्गदर्शक व खेळाडू यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्व स्पर्धा संघटनेचे सचिव विजय बिराजदार यांनी यशस्वी पार पाढले .