ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी!अरविंद जाधव.

 

मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना विश्राम गृह यवतमाळ येथे नायब तहसिलदार संवर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांना वर्ग 2 चे ग्रेड तात्काळ लागु करणेबाबतचे निवेदन देण्यात आले.

 

 

सदर प्रकरणाबाबत संघटनेच्या वतीने मागील 03 एप्रील 2023 पासून संप पुकारण्यात आला होता परंतू त्यावेळेस मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी तात्काळ ग्रेड वेतन ₹ 4800/- लागु करत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचे मा. महसूल मंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर मा. मंत्री महोदयांनी सदर फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याबद्दल टिपणी केली आणि लगेच फाईल निकाली काढून शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन दिले. सदर निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष योगेश देशमुख, सचिव एकनाथ बिजवे, कार्याध्यक्ष दिलीप राठोड, धिरज थुल, उपाध्यक्ष संजय होटे, मुख्य सल्लागार दिलीप बदकी, राजेश कहारे, नरेंद्र थोटे, संजय गोर्लेवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *