महागांव! बिनविरोध खडका ग्रामपंचायत चा स्मार्ट ग्राम नागापूर तर्फे सत्कार व स्वच्छता अभियान
महागाव प्रतिनिधी – महागाव तालुक्यातील आदर्श, उपक्रमशील ,५० वर्षापासून ची बिनविरोध ग्रामपंचायत खडका येथील नूतन सरपंच ,उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार गावात स्वच्छता अभियान राबवून ,स्वच्छता कीट देऊन उमरखेड पंचायत समितीतील स्मार्ट ग्राम नागापूर ग्रामपंचायत ने केला. माजी जिल्हा परिषद सदस्य चितंगरावजी कदम सर, माजी सभापती तथा माजी सरपंचा सविता ताई कदम, डॉ. अंबादास कदम, तसेच नागापूर ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी यांनी खडका गावात सकाळी स्वच्छता अभियान राबविले. नूतन सरपंचा कमलबाई अरुणराव देशमुख, उपसरपंच दत्तराव आत्माराम कदम, सदस्य पांडुरंग मारोती गायकवाड, संतोष मैनाजी भालेराव, सदस्या विद्याताई दिपकरव साळसुंदर,उषाताई राजेंद्र ठाकरे ,पूजा गजानन देशमुख, प्रगती रवींद्र हनवते यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पेन व डायरी देऊन यथोचित सत्कार केला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव देशमुख ,माजी सरपंच संदीप कानडे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन देशमुख, पोलीस पाटील नितीन ठोके, ग्रामसेवक पुंडे साहेब ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नागरगोजे सर, बा ना विद्यालयाचे मुख्याध्यापक गोंडे सर, ग्रामपंचायत चे ऑपरेटर विलास देशमुख, कर्मचारी दशरथ मारडकर, अंगणवाडी सेविका उषाताई भामकर, आरोग्य कर्मचारी आंबेकर ताई, राठोड साहेब, आम्रपाली गायकवाड ,जमदाडे काकू बचत गटाच्या अध्यक्षा मायाताई राऊत यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तसेच खडका ग्रामपंचायत ने गावात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी त्यांना स्वच्छतेचे सर्व सामान कुदळ ,खोरे, टोपले, टिकास, कोयते ,विळा, झाडू खराटा देण्यात आले. सर्व प्रथम सार्वजनिक चावडीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नागापूरच्या सर्व टीमचे सर्वप्रथम शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आला .खडका ग्रामपंचायत ने ५० वर्षांपासून ची बिनविरोधची परंपरा या वर्षीही कायम राखल्यामुळे त्या सर्वांचे सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो असल्याचे चितंगरावजी कदम सर यांनी सांगितले. राज्यातील सर्व ग्रामपंचायत ने या गावचा आदर्श घेण्यासारखे असल्याचेही सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव जी देशमुख खडकेकर यांनी चितंगरावजी कदम सर व त्यांच्या गावचे सत्कार केल्याबद्दल आभार मानले आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही परंपरा आजही कायम असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.संदीप शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी मंडळी, कर्मचारी ,शिक्षक वृंद ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागांव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख