राष्ट्रिय बंजारा परिषदेचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली उपोषण स्थळी भेट.
विशेष प्रतिनिधी! यवतमाळ
दि.29 ऑक्टों रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे गोरबंजारा समाजाच्या हक्कासाठी चार समाजबांधवां श्री.राजेश राठोड,श्री.अमोल राठोड,श्री.श्याम राठोड,श्री.सचिन राठोड यांच्या तर्फे अन्न त्याग व जल त्याग उपोषण सुरू आहे या उपोषणाला धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या उपोषणाला पाठींबा दिला व राज्य सरकारने या ऊपोषणा विषय त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला.या भेटी दरम्यान श्री.सुहासभाऊ पवार(राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य)राष्ट्रिय बंजारा परिषदेचे राज्य समन्वयक वसंतराव राठोड, किसन जाधव सिंगदकर(राज्य संघटक),महिला संघटक पुष्पाताई जाधव,तेवीचंद महाराज,गोर बाळुभाऊ राठोड(यवतमाळ जिल्हाध्यक्ष),श्री.रामराव राठोड,श्री.विष्णु आडे,श्री.सुनील राठोड,अतुल राठोड,विशाल जाधव,काजलताई रूडे,निर्मलाताई आडे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.