महागांव / एम डी शिक्षणासाठी निवड झालेल्या शुभम चक्करवारचा सत्कार.
महागाव विशेष प्रतिनिधी यांची रिपोर्ट.
महागाव:-वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या असलेल्या ट्रान्सफुशन मेडीसिन अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल डॉ.शुभम चक्करवार यांचा जनआंदोलन आधार संघर्ष समितिच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महागाव येथील डॉ.शुभम महेश चक्करवार यांची वैद्यकीय क्षेत्रात महत्वाच्या असलेल्या एम डी ट्रान्स फुशन मेडिसिन या अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जामनगर गुजरात येथे निवड झाल्या बद्दल विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ना. तहसीलदार माया ठोके,महागाव पोलिस स्टेशनचे उप पो.नि. सागर अन्नमवार यांच्याहस्ते शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात येवुन त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जगदीश नरवाडे, योग शिक्षक कैलास भांगे,सोसायटी अध्यक्ष बापुराव देशमुख, महेश चक्करवार,उषा चक्करवार,पोलिस कर्मचारी वसीम शेख उपस्थित होते.