महागांव / खडका येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य तपासणी,
महागांव तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खडका या गावाकडे पाहिले जाते. या गावात अनेक उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम १आक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गावातील सार्वजनिक चावडीवर जेष्ठ नागरिकांचा सत्कार व आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री विजयराव देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेंद्र पुरोहित, प्रकाशराव देशमुख,अरूनराव देशमुख, आनंदराव देशमुख, किसनराव देशमुख, जयसिंगराव देशमुख, बळवंतराव चवरे, किशोर राऊत, संदीप कानडे सरपंच, नितीन ठोके पो. पा. हे होते.मान्यवरांच्या हस्ते गावातील ८० वर्षा वरील जेष्ठ नागरिक शेषराव देशमुख, तुकाराम देशमुख, सुरेशचंद्र पुरोहित, सोनबा भामकर, श्रीराम जमदाडे, शंकरराव भोयर, नागोजी ससाने,रामा भालेराव, नागोजी बोरकर तसेच दारुचे व्यसन सोडणारे दिपक चवरे यांचा शाल ,श्रीफळ ,हार व पेढे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच सर्व जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खडका येथील परिचारिका पी.व्ही.अंबेकर, मदतनीस जमदाडे काकू, आशा वर्कर आम्रपाली गायकवाड यांनी केली व औषधीचे वाटप केले.या जेष्ठ मंडळींनी आयुष्यभर केलेले काबाडकष्ट, मेहनत, त्यांनी गावकऱ्यांना दिलेले संस्कार,शिकवण, एकत्रित कुटुंब पद्धती सांभाळणे हे नवीन पिढीला कळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ संदीप शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक श्री दत्तराव कदम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तराव कदम, राजेंद्र ठाकरे, डॉ संदीप शिंदे, दशरथ मारटकर, गजानन सुरोसे, पांडुरंग कदम, श्रीकांत कार्लेकर,अलताफ शेख यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी गावकरी, महिला व बाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख