महागाव/खडका येथे निघाला धामीन जातीचा साप. अंबोडा येथील सर्प मित्रांकडून जीवनदान.
महागाव/ खडका खडका येथील रहिवासी श्रीकांत जिल्लरवार यांच्या राहत्या घरात दुपारी धामीन जातीचा साप आढळून आला. त्याने लगेच ही माहिती सर्पमित्रांना कळविली.तर लगेच सर्पमित्र अर्शद शेख यांचा कडुन ताबडतोब येऊन रेस्क्यू करण्यात आला. सर्पमित्र कडून सापाल सुखरूप पकडण्यात आले.
तालुक्यातील कोणत्याही गावी (घरी) साप निघाला की सर्पमित्रांकडे फोन आला की ते क्षणाचाही विलंब न करता थेट साप निघालेल्या घरी पोहोचतात . रात्र असो ,पाऊस असो, ऊन असो, किंवा वारा असो ते जिवाची काळजी न घेता सापाला पकडून तो जीवनदान देतात. असेच तालुक्यातील प्रविण कांबळे(अंबोडा), कुनाल बनसोड अंबोडा, आशिष हातमोडे ( हिवरा),लखन शेख (अंबोडा) अर्शद शेख (अंबोडा)प्रिन्स जाधव( सवना) हे सर्पमित्र मंडळी आहेत.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख