आरोग्य

नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे

नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे.

(महागाव येथे सात दिवसीय योग शिबिराचा समारोप) रच

 

महागाव- शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असुन प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा आवश्यक आहे.त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहून अकाली मृत्यु टाळता येतोच असे प्रतिपादन तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले आहे.

स्वर्गीय उत्तमराव शंकरराव नरवाडे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त योगा शिबिराचे आयोजन

२५ सप्टेंबर ते २ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले होते. परिसरातील जनतेने योगा करून जीवनमान तंदुरुस्त करण्याचा संकल्प या ठिकाणी केला.

आज प्रत्येक घर हे औषधे,डॉक्टर यांच्यावर ५० टक्के वर अवलंबून आहे त्यांना मुक्ती द्यायची असेल ,निरोगी राहायचे असेल तर प्रतिदिन योगा स्वतः करणे अति महत्त्वाचे आहे शिबिरामध्ये अनेक वृद्ध लोकांना अप्रतिम फायदा झाला जसे मान दुखी कंबर दुखी गुडघेदुखी यावर सात दिवसात खूपच आराम झाला त्यामुळे ते सर्वच लोक नित्य योगा वर्ग चालू करा अशी मागणी करत होते

वरील काही लोकांचं आयुष्य सत्तर टक्के पेक्षा जास्त संपल्यावर योगा अभ्यास बाबत त्यांच्या लक्षात आले आज आपलं वय बघता वेळेत सावध झालेले बरे

योगाभ्यास करण्या करिता वय नसते,तसेच नियमित योगा करण्याने आजार जडणार तर नाहीच उलट अकाली मृत्यू सुद्धा टाळता येऊ शकतो असे जगदीश नरवाडे यांनी म्हटले आहे.

या योग शिबिर स्थळी ७ वर्षाच्या बालकापासून ७५ वर्षा पर्यंत साधक हजर होते सर्वांनी सारखा योग अभ्यास केला. यावेळी योग प्रशिक्षक प्रकाश वानरे ,माधुरी वानरे, मुक्तेश्वर पद्मावार ,वर्षाताई हरणे, ज्योतीताई नारखेडे, रंजनाताई किनीकर, नंदाताई बोरकर, माधुरी सतीश देवरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी मा. आमदार राजेंद्र नजरधने, कैलास भांगे, प्रदीप गंगमवार, विलास मंदाडे सिंधुताई नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीसाठी सुधीर नरवाडे ,विजय सुर्यवंशी, स्वप्निल नरवाडे, महेश चक्करवार, सतीश देवरकर, गोपी चक्रवार नंदू कावळे ज्ञानेश्वर काप्रतवार, विजय माटाळकर,सुरेश नरवाडे, रामचंद्र वानखेडे ,दत्ता जाधव ,संजय विजय नरवाडे, मंगेश वानखेडे,चंद्रकांत कदम,चिन्मय पाटील वानखेडे ,वैशाली चंद्रकांत कदम, उषा महेश चक्रवार रसिका जगदीश नरवाडे यांनी परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे आभार सौ केतकी पांडे यांनी मानले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *