पोफाळी / आज पुन्हा धडकल्या वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर
पोफाळी सर्कल प्रतिनिधी/ सुहास खंदारे
पोफाळी: दोन दिवसांपूर्वी पोफाळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वसंत नगर परिसरातील वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर धडकल्या होत्या….27 तारखेच्या आश्वासनानंतर आज वार्ड क्रमांक पाचच्या महिला पुन्हा ग्रामपंचायत वर धडकल्या… 27 सप्टेंबरला पोफाळी ग्रामपंचायतची मासिक सभा घेण्यात आली त्यानंतर या महिलांनी दोन तास सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले…
जोपर्यंत आमच्या वार्डातील समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा घेतला होता त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी वार्ड क्रमांक पाच पाहणी करून तात्काळ स्ट्रीट लाईट दुरुस्ती व वार्ड क्रमांक पाच मध्ये धूर फवारणी करण्याच्या आश्वासन देत सध्या या रस्त्यांवर खडक टाकून रस्त्याची डागडुजी करण्यात येईल असे आश्वासन दिले… सरपंच यांनी जसा निधी येईल त्याप्रमाणे या वार्डातील कामे करण्यात येईल अशा आश्वासनानंतरच महिला शांत होत आपले आंदोलन मागे घेतले…
त्यानंतर आज वार्डातील पोल वरील स्ट्रीट लाईट दुरुस्त करून चालू करण्यात आली तर आज धूळ फवारणी करण्यात आली आहे त्यामुळे महिलांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे…