हिमायतनगर / खासदार हेमंत पाटिल यांच्या कडुन देवराये कुटूंबाला एक लाखाची मदत.
मुख्यसंपादक / एस.के. चांद
हिमायतनगर – मराठा आरक्षण मिळत नसल्याने नैराश्ये पोटी आत्महत्या केलेल्या कामारी येथिल सुदर्शन देवराये यांच्या कुटूंबाला खासदार हेमंत पाटिल यांनी रोख एक लाख रूपयाची मदत केली असुन यापुढे पत्नीला गोदावरी अर्बन बँकेत नौकरी लावु असा शब्द दिला असल्याची माहिती सकल मराठा समाजा कडुन दिगांबर शिरफुले यांनी माध्यमांना दिली.
दि. २६ मंगळवारी कामारी येथिल साखळी उपोषणाला खासदार हेमंत पाटील यांनी भेट देवुन उपोषणार्थींशी संवाद साधला, सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून गरज पडल्यास संपर्क साधा केंव्हाही सहकार्य करतो असे सांगत, यथायोग्य एक लाख रुपयाची मदत सुदर्शन देवराये यांचे वडील ज्ञानेश्वर देवराये यांच्याकडे दिली. खासदार भाऊंची भावना होती, या हाताकडुन त्या हाताला दिलेल्या दानाचा उल्लेख होवु नये, त्यामुळे कुठे मदत दिल्याचा उल्लेख खासदार महोद्यांनी केला नसला तरी, त्यांनी केलेली मदत, देवराये कुटूंबाने स्विकारली, भविष्यात गोदावरी अर्बन बँकेच्या शाखेत सुदर्शन देवराये यांच्या पत्नीला योग्य पदावर नौकरी देवु असाही शब्द त्यांनी उपस्थितां समोर दिला. असल्याच शिरफुले म्हणाले.