नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.
एस. के. चांद यांची बातमी
नांदेड:- महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया जी यांच्या संकल्पनेतील जन शक्ती अभियाना अंतर्गत दिनांक 28/09/2023 रोजी आम आदमी पक्षा चे आयोजक ॲड. अनुप आगाशे जिल्हाध्यक्ष ली आघाडी यांच्या वतीने महात्मा फुले, सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्या जवळ आय. टी. आय. कॉर्नर नांदेड येथे ईद -ए- मिलाद आणि गणपती विसर्जन सभासद नोंदणी निमित महारक्तदान शिबीर व अन्नदान वाटप कार्यक्रम तसेच आम आदमी पार्टीचे जनशक्ती अभियान संपन्न झाले ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष युवक यांच्याशी संवाद साधुन आम आदमी पार्टी बद्दल त्यांना माहिती देण्यात आली आहे आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा व शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात असून अनेकांनी सभासद नोंदणी करून रक्तदान सुधा करून कार्यक्रम संपण केला या कार्यक्रमांत उपस्थित ॲड. अनुप आगाशे आम आदमी पार्टी लीगल आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष , अमर वाघमारे मीडिया आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष, बालाजी नागेश्वर व्यापारी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष,
सचिन शिंदे सहकार आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष ,सोम भारती महाराज दक्षिण तालुका अध्यक्ष नांदेड, रवी पोटफोडे, राजू गायकवाड, उत्तम लांडगे,संतोष वाघमारे, महेंद्र अटकोरे , राजेश गायकवाड, आशिष कांबळे, आकाश नवरे, भिमराव पंडित, राम शिंदे, देवानंद कोकाटे, अदी उपस्थित होते.