आरोग्य

महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी

महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी

 

महागाव विशेष प्रतिनिधी /

 

यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ

महागाव तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव हे गाव अतिदुर्ग भागात वसलेले आहे. या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नाही. सध्या पावसाच्या उघडझाप वातावरणामुळे गावात सांडपाण्याच्या डबक्याची विल्हेवाट होत नसल्याने, अनेक ठिकाणी गंदगी फैलावत आहे. परिणामी डासांची उत्पत्ती झाली. यामुळे डेंगू मलेरियाच्या रुग्णसंखेत वाढ होत आहे.

डोंगरगाव या ठिकाणी लहान मुले वृद्धांना डासांचा प्रदुर्भाव होऊन डेंगू मलेरिया हा आजार मोठ्या पसरून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महागाव आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. डोंगरगाव ग्रामपंचायत स्तरावर गावात स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाण्याची विलेपट होत नसून स्वच्छता अभियानाला हरताळ फासल्या जात आहे. सर्वत्र आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता वातावरणाची निर्मिती आवश्यक आहे. ग्रामपंचायत सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारीयांचे यासंदर्भात मोठे दुर्लक्ष होत असल्यामुळे, गावात रोगराई पसरल्याने अनेक लहान बालके डेंगू मलेरिया सारख्या रोगाच्या प्रकोपाने ग्रासली आहेत. उपचारार्थ त्यांना पुसद नांदेड या ठिकाणी जावे लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *