उमरखेड / पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन.
भारतीय_जनसंघाचे संस्थापक_नेते, प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानववाद व अंत्योदयाचे प्रणेते
उमरखेड तालुका प्रतिनिधी/ संजय काळे.
पंडीत_दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्ष उमरखे तालुका व शहर वतीने उमरखेड विधानसभेचे आमदार श्री.नामदेवराव ससाणे यांच्या निवासस्थानी जयंती साजरी करून प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार नामदेवराव ससाणे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अंबादासपंत साकळे सर, जिल्हा सचिव महेशजी काळेश्वरकर यांनी दीनदयालजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचलन पुंडलिक कुबडे यांनी केले तर आभार चंद्रशेखर तिवरगकर यांनी मानले.यावेळी उमरखेड विधानसभेचे विस्तारक पुंडलिकराव सुर्यवंशी, भाजपाचे तालूका अध्यक्ष सुदर्शन पाटील, विजय आडे,विष्णु पवार, अनिल माने, संजय देशमुख, रवी देव,अरविंद देशमुख,मोहन थोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.