उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे.
आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून उमरखेड येथील एस डी पी ओ ऑफिस जवळ उमरखेड तालुक्यातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी विजय कदम, शेख इरफान, बाबुराव ढगे हे उपोषणाला बसलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अनेक खेड्यामध्ये रात्रंदिवस खुलेआम अवैद्य दारूची विक्री फार मोठ्या प्रमाणात होत आहे मटका, गुटखा खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रत्येक पान टपरीवर गुटखा,खरा खाताना युवक दिसत आहेत हे सर्व धंदे कायमस्वरूपी बंद करून संबंधित अवैध धंदे चालकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच महिला शाळकरी मुले मुली या रस्त्याने जाणे येणे करतात तसेच शाळकरी मुले मटका लावण्याकडे वळताना दिसत आहेत व शेतकरी गोरगरीब सुद्धा मोठ्या प्रमाणात मटका जुगाराकडे वळल्या जात असल्याचे दिसून येत आहेत तसेच पुढे गणपती, ईद-ए-मिलाद, दुर्गादेवी उत्सव,दसरा,दिवाळी,असे अनेक प्रकारचे सण येत आहेत. असे पुढे गैरप्रकार घडू नये म्हणून हे चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे व सामान्य नागरिकांची होणारी लूट थांबवावी.