उमरखेड येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट
आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन
उमरखेड, दि. 13 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले आहे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषण आंदोलन सुरू आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. आंदोलकांच्या आरोग्याची प्रशासनाला काळजी आहे. आरक्षणाचा विषय हा धोरणात्मक असून शासनस्तरावर त्याबाबत कार्यवाही सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविण्याची कार्यवाही केली आहे. आंदोलकांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे 8600241916