उमरखेड/ ब्राह्मणगांव येथील युवकांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.
उमरखेड तालुका प्रतिनिधी : संजय काळे.
उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील 33 वर्षिय युवकाने गावातील सार्वजनिक विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. 6 सप्टेंबर रोजी घडली आहे. मारोती ग्यानबा गायकवाड वय 33 वर्षे धंदा मजूरी, रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड याने दि. 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताचे सुमारास म्हैसकर पिठगिरणी जवळील जुन्या विहीरीत उडी मारून आमहत्या केल्याची घटना दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रभारी
पोलीस पाटील सुनिल देवसरकर, सरपंच परमात्मा गरुडे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला कळविल्या नंतर पीएसआय किशोर घोडेस्वार, पो. कॉ. प्रशांत कदम यांनी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालय उमरखेड येथे पाठविले आहे.