ताज्या घडामोडी

उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला परवानगी नाकारली. 

उमरखेड पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीला परवानगी नाकारली.

 

उमरखेड तालुका. प्रतिनिधी संजय काळे

 

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात उमरखेड येथे आमरण उपोषण सुरू आहे.सदर सुरू असलेल्या आंदोलनाला तालुका वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने आज दिनांक 8/9/2023 रोजी पाठिंबा देण्यात आला.व येत्या दोन दिवसात मराठा आरक्षणाचा तिढा न सुटल्यास वंचित बहुजन आघाडी उमरखेड च्या वतीने दिनांक 10/9/2023 रोजी माहेश्वरी चौक उमरखेड येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा पोलीस स्टेशन उमरखेडचे ठाणेदार(Pi) शंकर पांचाळ यांना देण्यात आला.पोलीस स्टेशन उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे शिष्ट मंडळ दाखल झाले आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन ठाणेदार साहेबाला देण्यात आले.निवेदन पाहताच ठाणेदार साहेबांनी आंदोलनाचा धसका घेतला व रास्ता रोको आंदोलन करू नका अशी आम्हा पदाधिकाऱ्यांना विनंती केली.राज्यात पेटलेले मराठा आंदोलन व पोळ्या सारख्या सणाच्या मुहूर्तावर उमरखेड सारख्या सेन्सिटिव्ह शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये.‌मराठा समाजासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले तर मराठा समाजाच्या भावना अजूनही तीव्र होतील आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरत असेल तर आपणही रस्त्यावर का उतरू नये, उद्या त्याच पद्धतीने सकल मराठा समाज अशाप्रकारचेच आंदोलन करेल,त्यानंतरही विविध पक्षाच्या वतीने आंदोलन होतील आणि परिस्थिती अवाक्या बाहेर जाईल.अशी ठाणेदार साहेबांनी आम्हास विनंती केली, परंतु सर्व पदाधिकारी आंदोलन करायचे अशा भूमिकेवर ठाम असल्यामुळे..! ठाणेदार साहेबांनी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब यांचे भ्रमणध्वनी द्वारे मार्गदर्शन घेतले.जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी फोन का रे चर्चा करून विनंती केली.की आपण आपले आंदोलन काही दिवस पुढे ढकलावे, तत्पूर्वी दिनांक 13/9/2023 रोजी यवतमाळ जिल्ह्याचे दोन प्रमुख आपल्या शहरात येणार आहेत.! मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, व मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. पवन बनसोड साहेब यवतमाळ..! यांची स्पेशल भेट मी आपणास घडवून देतो आपल्या जे काही समस्या असतील त्याचे नक्कीच निवारण केल्या जाईल.! तूर्तास आपण आपले आंदोलन थांबवावे अशी विनंती केली..!मा. ठाणेदार साहेब उमरखेड, व जिल्हा अपर पोलीस अधीक्षक साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन तूर्तास आम्ही आमचे आंदोलन पुढे ढकलत आहोत,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *