उमरखेड / मराठा क्रांती मोर्चाच्या चार कार्यकर्त्याचे आजपासून आमरण उपोषण सुरू.
सत्यशोधक शेतकरी संघाचा आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा
प्रतिनिधी उमरखेड . संजय काळे
मागील 40 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित असून सद्यस्थितीत मराठा समाज आर्थिक शैक्षणिक अवस्था अत्यंत बिकट झाली असून आता मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक संधी न मिळाल्यास मराठा समाजास दुर्बलतेच्या खालील लोटल्या जाईल त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून तहसील प्रांगण येथे सचिन गाडगे गोपाल मधुकर कलाने सुदर्शन दत्तराव जाधव शिवाजी विठ्ठलराव पवार हे चार मावळे आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणापासून माघार न घेण्याचा निर्णय या मराठा सेवकांनी घेतला आहे या उपोषणादरम्यान सकल मराठा समाज सहभागी होणार असून समाजाकडून उपोषणासह विविध मार्गाने प्रतीकात्मक आंदोलने करण्याचा समाज बांधवांचा मानस आहे या उपोषण कालावधीमध्ये उपोषण ठिकाणी विविध समाजप्रबोधनात्मक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाईल या उपोषणादरम्यान घडणाऱ्या सर्व घडामोडींना शासन जबाबदार राहील शासनाने सदरील उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून तात्काळ न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती उपोषण कर्त्यानीं सचिन घाडगे गोपाल कलाने सुदर्शन जाधव शिवाजी पवार यांनी केली आहे
यावेळी सकल मराठा समाज बांधव भगीनी उपस्थित होते प्रमुख मागण्या
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे संसदेत आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला वेगळी संरक्षणाची तरतूद करण्यात यावी कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत विदर्भाचा समावेश करण्यात यावा मराठा आरक्षणासाठी आंदोलकावर आतापर्यंत झालेले जिल्हे सरसकट मागे घेण्यात यावे अंतरावली सराटी येथे झालेल्या अमानुष मीलाठी हल्ल्याची सखोल चौकशी करून जोशीवर कठोर कारवाई करावी अंतरावरील सराटी येथील आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावी ही मागणी उपोषण करण्याची आहे.