जालन्यात मराठा उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटीच्यार्जच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद
उमरखेड /तालुका प्रतिनिधी: संजय काळे
जालन्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधव संनदाशिर मार्गाने आरक्षण ची मागणी करनाऱ्या मराठा अंदोलकांवर अमानुष पणे पोलीसांकडुन बेसुमार पणे घेरून लाठीचार्च करण्यात आला या मध्ये पोलीसांनी महिला , वृद्ध – बालका सह अनेक जण रक्तबंबाळ झाले त्याचा निषेध म्हणून सकल मराठा समाजा ने आज सोमवारी उमरखेड शहर बंद ची हाक दिली होती शहरातील पान टपरी सह पुर्णत : बाजार पेठ सकाळ पासुन बंदच होती , महामंडळाच्या बसेस रस्त्यावर धावल्या नसुन , पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा ,महाविद्यालय , नर्सरी ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठविले नसल्याने शाळा – महाविद्यालय ओस पडल्या होत्या फक्त मेडिकल – रुग्णालय सेवा , पट्रोल पंप सुरु होते हा बंद उत्स्फूर्तपणे असल्याने सुकसुकाट निर्माण झाला होता.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या लगतच्या न .प . छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल समोर बंद आंदोलना मध्ये शेकडे वर सकल मराठा समाज बांधवांनी ‘ आरक्षण आमच्या हक्कांचे , नाही कुनाचे बापाचे ‘ आरक्षण घेतल्या शिवाय राहत नाही अश्या घोषणा देत शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध करीत ठिय्या आंदोलन केले या बंद ला विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता तालुक्यातील ठाणकी – मुळावा – पोफाळी बाजार पेठ सुद्धा बंद ठेवण्यात आली होती.बंद आंदोलनात जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हा अध्यक्षा सरोज देशमुख , विजयराव खडसे , तातु देशमुख , कृष्णा पाटिल देवसरकर , राम देवसरकर , गोपाल अग्रवाल , भिमराव पाटिल चंद्रवंशी , चिंतागराव कदम , संदिप ठाकरे , प्रदिप देवसरकर , प्रविण पाटिल मिराशे , ॲड युवराज पाटिल देवसरकर , गजानन चव्हान , प्रविण सुर्यवंशी दतराव शिंदे , शिवाजी वानखेडे , स्वप्नील कनवाळे , सचिन घाडगे , गुणवंत सुर्यवंशी ,शिवाजी वानखेडे , वसंत देशमुख , अरविंद भोयर , कैलास कदम , संजय बिजोरे , विनायक कदम , सुदर्शन रावते , किशोर वानखेडे , गोपाल कलाने , पुडलिक कुबडे , डॉ गणेश घोडेकर , बळवंत चव्हाण , राहुल मोहितवार , संदिप घाडगे , गजानन सुरोशे , अमोल पंतीगराव , प्रविण कलाणे , रविराज धबडगे बालाजी वानखेडे , उतमराव वानखेडे , डॉ त्र्यंबक माने , डॉ विवेक पत्रे , डॉ श्रीराम रावते , डॉ दिगांबर चव्हान , डॉ गजानन येलोरे , सुर्यकांत पंडित , आकाश माने , गजानन देशमुख , साहेबराव कांबळे , संगीता वानखेडे , वर्षा देवसरकर , सपना चौधरी यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.प्रहार जनशक्ती, पक्ष एम आ एम मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उभाटा उमरखेड शहर काँग्रेस कमिटी भारत राष्ट्र समिती बी आर बीएस पुरोगामी युवा ब्रिगेड महानायक प्रतिष्ठान उमरखेड मुस्लिम बांधव समाज उमरखेड व्यापारी महासंघ उमरखेड पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद यांनी जाहीर पाठिंबा दिला