उमरखेड येथे भाविक भाऊ भगत यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भेट दिली.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे.
सक्षमीकरणासाठी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला मोर्चाचे संघटनात्मके पदे नियुक्त करण्यात आले. यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये
सौ अंजलीताई आशिष वाकडे यांची शहर सचिव पदी सौ माधवीताई जीवन राऊत यांची शहर सरचिटणीस पदी सौ मोनिकाताई अमोल महामुने यांची शहर सहसचिव पदी सौ माधुरी वाघमारे यांची शहर समन्वयक पदी नियुक्त्या करण्यात आल्या.तसेच सदस्य म्हणून ज्योतीताई सुरेश कल्याणकर वनमाला ताई रवी वाकडे ऋतुजाताई हेमंत चौधरी गंगाताई गोविंद भोकरे शबानाताई बेगम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठमके तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार सुरज तगडपल्लेवार महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ दुर्गाताई महामुने शहर उपाध्यक्ष पुजा तगडपल्लेवार शहर उपाध्यक्ष आश्विनी ताई भोकरे शहर संघटक सौ सारिकाताई महामुने उपस्थित होते.