उमरखेड / दिवट पिंपरी येथे शिक्षक द्या नाहीतर आंदोलनाचा इशारा!पुरोगामी युवा ब्रिगेड व ग्रामस्थांची मागणी.
उमरखेड तालुका प्रतिनिधी:- संजय काळे
उमरखेड तालुक्यामधील दिवट पिंपरी या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची कमतरता असल्यामुळे त्या गावातील गरीब शेतकरी पालकांच्या मुलांचं शैक्षणिक जीवन अंधारात आलेला असतानाच गटशिक्षणाधिकारी उमरखेड यांना गावातील शाळा समितीचे अध्यक्ष ,सरपंच यांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.दिवट पिंपरी नवी गावात २९ विद्यार्थी असून त्या ठिकाणी एकच शिक्षक आहे व त्या शिक्षकाकडे मुख्याध्यापक व बी एल ओ चा चार्ज आहे तीच परिस्थिती दिवट पिंपरी जुनी या गावात असून या गावात २८ विद्यार्थी पटसंख्या आहे त्या गावात सुद्धा एकच शिक्षक आहे दोन्ही गावाची गट ग्रामपंचायत एक असून या गावातील शाळेतील शिक्षक काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास शाळा बंद करण्यात येत आहे याची कोणतीही दखल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड घेत नसल्यामुळे वेळोवेळी त्यांच्या कानावर तक्रारी करून सुद्धा दोन्ही गावांमध्ये एक एक शिक्षक देत नसल्यामुळे १ सप्टेंबर पासून गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात सर्व विद्यार्थी आणून आमरण उपोषणाचा इशारा पुरोगामी युवा ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष भागवत बा सूर्यवंशी दिवट पिंपरी चे सरपंच चंचलताबाई सूर्यवंशी, अँड सचिन सूर्यवंशी ,अमृत बाबाराव सूर्यवंशी (संचालक खरेदी विक्री संघ उमरखेड) संदीप सुकळकर, शिवशंकर सुरोशे जिल्हा अध्यक्ष पुरोगामी युवा ब्रिगेड ,कुणाल सूर्यवंशी माजी सरपंच, बाळासाहेब सूर्यवंशी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पिंपरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.येत्या सात दिवसात सर्व चौकशी करून दिवट पिंपरी येथे दोन शिक्षक देण्यात येईल प्रवीण कुमार वानखेडे गटविकास अधिकारी पं . स . उमरखेड