उमरखेड / गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा.कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढाकार.
उमरखेड तालुका प्रतिनिधी: संजय काळे
उमरखेड (य) श्री. शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, उमरखेड यांचे वतिने दिनांक 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान कृषि महाविद्यालयाचे परिसरामध्ये विविध ठिकाणी गाजर गवताचे निर्मूलन समुळ नष्ट करुन सप्ताह साजरा करण्यात आला.
वर्ष 1950 मध्ये भारतात आलेल्या या विदेशी तणाचा प्रसार इतक्या जास्त प्रमाणात झाला की नंतर सगळीकडे हेच गाजर गवत दिसायला मिळत आहे. शासनामार्फत वेळोवेळी विविध अभियान राबवून गाजर गवताचे निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यात आले, याच दृष्टीकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर गाजर गवत खाणारे किडे झायगोग्रामा बायक्लोराटा या किडीचे महाविद्यालयात संगोपन करण्यात आले होते. या गाजर गवत निर्मूलन सप्ताहाच्या निमित्त्याने 500 किडे गाजर गवत खाण्याकरीता सोडण्यात आले.
यावेळी यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने व उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचा सहभाग होता.
वरील अभियाना करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. के. चिंतले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. व्ही. बी. शिंदे, किटकशास्त्र विभागाचे श्री. के. व्ही. आगे व श्री. वाय. एस. वाकोडे, सहाय्यक प्राध्यापक, श्री. एस.एन. अंभोरे तसेच आदी सर्व सहाय्यक प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.