स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कच्या नावावर होणारी आर्थिक लुट थांबवा
▪️भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पालकमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने विविध विभागाच्या नोकर भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केल्या जात आहे असा आरोप करत भारतीय विद्यार्थी मोर्चाने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे सरळ सेवा परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला नऊशे रुपये शुल्क आकारल्या जात आहे शासनाच्या माहितीनुसार तलाठी भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यासाठी एक हजार शुल्क आकारण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने ११० कोटी रुपये विद्यार्थ्याकडून गोळा केले आकारणीच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्याकडून करोडो रुपयाची माया जमा करत आहे मोल मजुरी करणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी नोकर भरतीसाठी अर्ज करतात परंतु परीक्षा शुल्कच्या नावाखाली होत असलेल्या मनमानी कारभारामुळे आर्थिक अडचणीत येत आहे तसेच स्पर्धा परीक्षा ही पारदर्शक व्हावी परीक्षार्थींना दिलेल्या पेपरची ऑनलाईन डिजिटल कार्बन कॉफी विद्यार्थ्यांना देण्यात यावी परीक्षा केंद्रावर मेटल डिटेक्टर तसेच मोबाईल जामर लावण्यात यावे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व स्वरूपात जागा भरण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री संजय राठोड यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुका अध्यक्ष जयशिल कांबळे यांनी दिले आहे
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख