ताज्या घडामोडी

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.

घोटी येथिल सेतूचालक धनराज पवार स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून सन्मानित.

 

 

घाटंजी – तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागात वसलेल्या घोटी येथे सेतू चालविणारे धनराज पवार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या कागदोपत्री समस्या जिव्हाळ्याने घेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास न होवू देता तातडीने सोडवित पारदर्शकता बाळगत घाटंजी तालुक्यात नाव लौकीक झालेले धनराज पवार यांची प्रशासनाने दखल घेत दिनांक १५ ऑगस्ट २०२३ या स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालयात उत्कृष्ट सेतूचालक म्हणून प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.आपल्या कार्यातून जनतेला समाधान देणारे सेतूचालक धनराज पवार यातच आपले समाधान मानतो.त्यांनी आदिवासी बहुल व दुर्गम भागातील जनतेला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेत प्रामुख्याने केंद्र सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या पिएम किसान शेतकरी सन्मान योजना यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांचे कागदोपत्री समस्या दूर करून त्यांची नोंदणी करून देणे, ई-पिक पाहणी राबविणे,माझा सात बारा, मिच नाेंदवीन माझा पेरा,यासाठी नवयुवक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन करणे, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड काढून देत त्याबाबतीत महत्व पटवून देणे, ई – श्रम कार्ड काढून देणे त्याबाबत मार्गदर्शन व लाभाविषयी माहिती सांगणे, त्याचसोबत सेतू कार्यालयातून निर्गमित होणारे दाखल्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविणे, आधार कार्ड विषयी समस्याचे निराकरण करणे,यासह विविध शासन स्तरावरिल कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनतेला सेवा पुरविणे हाच ध्यास मनाशी बाळगून कार्यरत राहणारे सेतूचालक धनराज पवार हे उच्चशिक्षित तरुण MPSC चा विद्यार्थी आहेत.आई व वडील लवकरच गमावलेल्या पवार यांना घरची जबाबदारी सांभाळत फारसे काही करता न आल्याने त्यांनी नौकरी सारख्या क्षेत्राचा विचार न करता एखादा छोटासा व्यवसाय करावा या उद्देशातून जनसेवा व सामाजिक कार्य हातून घडेल असे मानस पुढे ठेवून सेतूकेंद्र आणि ऑनलाईन कामे करण्याचा व्यवसाय अंगिकारला यातून अनेक कार्य चांगले होत असल्याने व नविन प्रणाली नुसार घोटी सारख्या ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट सेवा देत समाधान मानने भाग्य समजत कार्य करीत आहे.यातून जनते सोबतच शासनाला सुद्धा त्यांच्या भरीव कार्याची साथ मिळत असल्याने स्वातंत्र्यदिनी घाटंजी तहसिल कार्यालयात त्यांना उत्कृष्ट सेतू चालक म्हणून तहसिलदार विजय साळवे, अप्पर तहसिलदार मोहनिश शेलवटकर,निवासी नायब तहसिलदार शिवाजी जाकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी तहसिल मधील अधिकारी कर्मचारी यांचे सोबतच तालुक्यातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.त्यांना उत्कृष्ट सेतूचालक सन्मानीत केल्याने घोटी परिसरासह तालुक्यातून शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *