राजकारण

घाटंजी येते राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)ची आढावा बैठक.

घाटंजी येते राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट)ची आढावा बैठक.

 

घाटंजी प्रतिनिधी :

 

घाटंजी येते आज दी 20 ऑगस्ट रविवार ला राष्ट्रवादी शरद पवार गटाची आढावा बैठक हाँटेल मधुगीता येते पार पडली राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षते खाली व राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते सतीशभाऊ भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकित जितेंद्रबाबू ठाकरे,अशोक राऊत, राहुल कामारकर नलिनी ताई चौधरी,मनोज राठोड यांनी विचार मांडले या वेळी जिल्यातून आलेले भावनाताई लेडे, शीतल कुरटकर,निखिल गावंडे,संकेत टोणे हे प्रमुख उपस्तीत होते यावेळी आयोजन ऍड.नेताजी राऊत यांनी केले राष्ट्रवादीचे प्रमुख सुनील देठे मोहनमामा प्रधान,संदीप ढगले,विश्वास निकम, राजू महल्ले यांनी सहकार्य केले या वेळी तालुक्यातील ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्ते उपस्तित होते

मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते सतीश भोयर यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपरिषद स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला असून येत्या काही दिवसात तालुका अध्यक्ष, शहर व इतर शेल यांची कार्यकरणी जाहीर करून जास्तीत जास्त युवक व महिला यांना स्थान देण्याची घोषणा केली आणि आभार मनोज राठोड यांनी मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *